फोन हॅक करून वंचितच्या उमेदवाराला मतदानाची सूचना, जयंत पाटलांची पोलिसांत तक्रार

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रातील १४ जागांसह देशातील ११७ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे, लोकशाहीच्या उत्सवात देशातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत. राज्य आणि देशातील बड्या नेत्यांचे भवितव्य आज ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे.

Loading...

सांगली लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पहायला मिळत आहे, भाजपचे संजय काका पाटील, महाआघाडीचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये येथे लढत होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष जयंत पाटील यांच्या फोनवरून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास मतदान करण्याची सूचना करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे, त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जयंत पाटील यांनी मात्र ट्विटकरत आपला फोन हॅक करून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास मतदान करा, अशा सूचना फोनवरून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हि बाब अत्यंत निंदनीय असून याचा मी निषेध करतो. याबाबत इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे. असे म्हंटले आहे.

आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांचा मी प्रचार करत असताना आपण वंचितच्या उमेदवारा मतदान करण्याची सूचना का करेल ? असा सवाल यावेळी पाटील यांनी उपस्थित केला आहे.Loading…


Loading…

Loading...