कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्या – जयंत पाटील

सांगली: बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण मिळावे यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे, भाऊराव पाटील यांनी १९१९ साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करत बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची कवाडे खुली केल्याने आज लाखो मुले शिक्षण घेवू शकले आहेत. त्यामुळे त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्राला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कामाविषयी नितांत आदर आहे. मात्र शासन दरबारी त्यांच्या या कार्याची दखल घेतलेली नाही. जयंत पाटील यांनी याप्रकरणी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठविले आहे. तसेच केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे.

२०१९ साली रयत शिक्षण संस्थेची शताब्दी साजरी होत आहे, या निमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न प्रदान होणे हीच अण्णांना सर्वात मोठी श्रद्धांजली असल्याच जयंत पाटील यांनी पत्रात म्हंटले आहे.