मोदीजी, जरा रविशकुमारलाही एखादी मुलाखत द्या की !

टीम महाराष्ट्र देशा: अभिनेता अक्षयकुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली आहे, गैरराजकीय मुलाखतीमध्ये मोदींच्या जीवनाचे अनेक पैलू समोर आले आहेत. सत्ताधाऱ्यासह विरोधकांमध्ये देखील मुलाखतीची चर्चा रंगली आहे. यामध्ये आता विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदींवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

Loading...

माझेच प्रश्न आणि माझीच उत्तरे ही नरेंद्र मोदींची वृत्ती कायम आहे. अक्षयकुमारने नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली नसून मोदींनी अक्षयकुमारला प्रश्न विचारायला सांगितलं आहे. प्रश्नांची यादीही मोदींनीच दिली असणार, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी ट्विटकरत मोदींवर निशाणा साधला आहे.

जयंत पाटील यांनी मुलाखतीवर खोचक टीका करतानाच नरेंद्र मोदी यांनी रविशकुमारलाही एखादी मुलाखत द्यावी, असा टोला लगावला आहे.Loading…


Loading…

Loading...