राष्ट्रवादीत नेतृत्व बदलाचे वारे; महिना अखेरीस पक्षाला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष ?

jayant patil, shashikant shinde, dilip valse patil

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात रान पेटवल आहे. या आंदोलनाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळतोय. विशेषतः अजित पवार , धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत पक्षपात नवीन ऊर्जा प्रस्थापित केली आहे. या हल्लाबोल यात्रेची इस्लामपूर येथील सभा प्रचंड मोठी झाली होती.

Loading...

त्या सभेची राज्यात मोठी चर्चा सुद्धा झाली होती. याच सभेत अजित पवार यांनी आपल्या भाषणात ‘यापुढे जयंत पाटील यांना मतदारसंघात खिळवून ठेवू नका. राज्यातील पक्षाची धुरा त्यांना संभाळण्यासाठी वेळ द्या’, अस वक्तव्य करत पक्षात नेतृत्व बदल होण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे अभ्यासू आणि सुसंस्कृत नेता म्हणून पाहिले जाणारे जयंत पाटील यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी जवळपास निश्चित मानलं जातं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. महिना अखेरपर्यंत पक्षात नेतृत्व बदल अपेक्षित असून पक्ष नेतृत्वाची जबाबदारी आमदार पाटील यांच्यावर सोपविली जाण्याच्या शक्यतेने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये नेतृत्वबदल केला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी जयंत पाटील यांच्याबरोबरच आमदार शशिकांत शिंदे, आमदार दिलीप वळसे-पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत.Loading…


Loading…

Loading...