नुसत्या घोषणा करणाऱ्या सरकारचे सरण जनताच रचेल – नवाब मलिक

मुंबई : राज्यात स्वत:चे सरण रचून शेतकरी आत्महत्या करत असतील तर यासारखी वाईट परिस्थिती होवू शकत नाही. ही महाराष्ट्रासाठी धक्कादायक बाब आहे. सरकारने मोठा गाजावाजा करुन कर्जमाफीची घोषणा केली परंतु त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही. सरकारने नुसती घोषणा करणे बंद करुन प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पैसे द्यावे अन्यथा ही जनताच तुमचे सरण रचल्याशिवाय गप्प राहणार नाही. असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सरकारला लगावला आहे.

एका बाजुला सरकार सांगत आहे की, ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली त्यापैकी १४ हजार कोटी रुपये वाटप केल्याचे सरकार सांगत आहे. परंतु खरी परिस्थिती ही आहे की, शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीय. रोज आत्महत्या वाढत चालल्या आहेत. शेतकरी स्वत:ची चिता रचून आत्महत्या करत असतील तर यासारखी वाईट परिस्थिती होवू शकत नाही. सरकारने आता तरी जागे झाले पाहिजे आणि तात्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा द्यावा अशी मागणीही मलिक यांनी केली.

You might also like
Comments
Loading...