‘पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल’

मुंबई : महाआघाडी सरकारच्या कारभाराविरोधात जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सांगितले होते.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. याबाबात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना मलिक म्हणाले, ‘भाजपा २५ फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात मोर्चा काढणार आहे. पण त्यासाठी कायकर्ते कुठून आणणार, आंदोलनासाठी भाजपा रोजंदारीवर लोकं आणणार का ?,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Loading...

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘पुन्हा निवडणूका होऊं द्या. पाच वर्षांनी निवडणुका होतील, तेव्हा भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल,’ असा दावा नवाब मलिक यांनी यावेळी बोलताना केला. ‘सत्ता गेल्यामुळे भाजपाकडे आता कार्यकर्ते उरलेले नाहीत, कमळाबाईला शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली आहे,’ असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला.

वाचा नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील

‘महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याच्या विरोधात धरणे आंदोलनाद्वारे राज्यभरात जनजागृती केली जाणार आहे. महाआघाडी सरकार विसंवादाने कोसळेल, हे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार नाही. हे सरकार कोसळले तर भाजपा सरकार स्थापण्याचा प्रयत्न करणार नाही, असेही पाटील यांनी स्पष्ट केले होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....