गिरीश महाजानांना दबंगगिरी नडणार; गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी

टीम महाराष्ट्र देशा: जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी नरभक्षक बिबट्याला मारण्यासाठी वन अधिकाऱ्यांसह स्वत: बंधूक घेवून पाठलाग केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र हीच गोष्ठ त्यांना अडचणीत आणताना दिसत आहे. कारण महाजन यांनी वन कायद्याचा भंग केल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

Loading...

चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे आणि लोंढे शिवारात नरभक्षक बिबट्याने गेल्या दोन महिन्यात सहा लोकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे याभागातील नागरिकांना जीव मुठीत घेवून वावराव लागत आहे. दरम्यान सरकारने या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गिरीष महाजन हे सुरक्षेची कोणतीही तयारी न करता करत असलेल्या दबंगगिरीमुळे ते वन कायद्याचा भंग करत असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.Loading…


Loading…

Loading...