कॉंग्रसने आमचा विश्वासघात केला म्हणूनच ‘एकला चलो रे’

टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दीड वर्षांपासून गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी सुरू होती. भाजपला रोखण्यासाठी इथे काँग्रेससोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र काँग्रेसने सगळ्या ठिकाणी उमेदवार देऊन आमचा विश्वासघात केल्याने गुजरात मध्ये आम्ही वेगळं लढण्याचा निर्णय घेतला आहे अस राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय.

राष्ट्रवादीने जिथे-जिथे आपले उमदेवार उभे केले होते नेमक त्याच ठिकाणी कॉंग्रेसने आपले उमेदवार दिले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस कमालीची नाराज झाली आहे. एकीकडे पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने कॉंग्रेसला समर्थन दिल असलं तरी कॉंग्रसचा स्वाभाविक मित्र मात्र त्यांच्यापासून दुरावला आहे.