fbpx

विधानसभेसाठी राष्ट्रवादीमध्ये मोठे खांदेपालट, नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा पवारांचा विचार

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानसभेसाठी पक्षात खांदेपालट केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे अनेक नव्या नेतृत्वाला पक्षात संधी मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये सपाटून पराभवाचा सामना करावा लागल्याने सर्व विरोधीपक्ष आत्मचिंतन करत आहेत, यामध्ये पराभवाची कारणे शोधत त्यामध्ये सुधारणा केली जात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये देखील कॉंग्रेस – राष्ट्रवादीची परिस्थिती बिकट बनली आहे. यामध्ये आता राष्ट्रवादी

कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात खांदेपालट करण्याचे संकेत दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पक्षातील साचलेपण दूर करण्यासाठी शरद पवार यांच्याकडून हे पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती आहे.