बहुजनांची मते मिळवण्यासाठी शरद पवार यांचा ‘हा’ आहे मास्टर प्लॅन

मुंबई : यणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेससह मायावती यांच्या बसपा बहुजन समाज पार्टीशी आघाडी करण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. ते एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. कॉंग्रेससोबत आम्ही आघाडी करणारच आहोत.पण बसपा आमच्यासोबत आल्यास फायदाच होईल असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडणूक चिन्ह हत्ती होतं .आता बसपाच निवडणूक चिन्ह देखील हत्ती आहे. त्यामुळे बहुजन समाजाला मायावती यांच्याबद्दल सहानभूती आहे. तसेच मायावती ह्या तळागाळातून वर आलेल्या नेत्या असल्याचं बहुजन समजला वाटत असल्याने त्यांच्या मताचा आम्हला फायदा होईल.

आज महाराष्ट्रात बहुजन समाज मोठ्या प्रमाणात आहे. की जो भाजपपासून वेगळा आहे, बसपाशी आघाडी केल्यास त्याचा फायदा आम्हाला होईल. तसेच शिवसेनेने वेगळी निवडणूक लढवल्यास त्यांना त्याचा फायदा होईल असंही शरद पवार यावेळी म्हणाले.

अॅट्रॉसिटीबाबत मायावतींच्या दुटप्पीपणाचा भांडाफोड

घटनेत बदल करुन मराठा समाजाला आरक्षण द्या : शरद पवार