निवडणुकीपूर्वीचं जागा वाटपावरून आघाडीत रस्सीखेच, पुण्यासाठी काँग्रेसचा फिप्टी-फिप्टीचा फॉर्म्युला

Congress-NCP alliance for Sangli municipality possible?

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीला अवघे दोन – तीन महिने शिल्लक राहिल्याने सर्वच पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत, यामध्ये पुणे शहरातील आठ पैकी सहा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी होत आहे, तर कॉंग्रेसने मात्र निम्या – निम्म्या जागांचा फॉर्म्युला मांडला आहे.

लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही कॉंग्रसने घेतला आहे, दोन्ही कॉंग्रेसकडून राज्यातील सर्व जागांचा आढावा घेण्यात आला आहे. यामध्ये पुणे शहरातील वडगाव शेरी, हडपसर, पर्वती, कोथरूड, खडकवासला आणि शिवाजीनगर मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेण्याची मागणी होत आहे. मागील आठवड्यात झालेल्या राज्यव्यापी बैठकीत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून हि मागणी करण्यात आली आहे.

कॉंग्रेसकडून मात्र फिप्टी-फिप्टी’चा फॉर्म्युला मांडत शिवाजीनगर, कसबा, पुणे कॅंटोन्मेंट आणि पर्वती मतदारसंघ पक्षाला सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने सहा जागांची मागणी केली असली तरी अंतिम निर्णय दोन्ही पक्षांचे नेते घेणार आहेत.

 Loading…
Loading...