fbpx

राष्ट्रवादीची दुसरी यादी : मावळ मधून पार्थ पवार तर शिरुरमध्ये अमोल कोल्हेंना उमेदवारी

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता प्रत्येक पक्ष जोरदार तयारी लागला आहे. तर  राष्ट्रवादी कडून  दुसरी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मावळ मधून पार्थ पवार , शिरूर मधून  अमोल कोल्हे , बीड मधून  बजरंग सोनावणे, नाशिक मधून  समीर भुजबळ , तर  दिंडोरी  मधून धनराज महाले यांची वर्णी लागली आहे. मात्र बहुचर्चित असणारी माढा मतदार संघाची जागा अद्याप जाहीर झालेली नाही.

राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर

मावळ- पार्थ पवार
शिरुर- अमोल कोल्हे
नाशिक- समीर भुजबळ
बीड- बजरंग सोनवणे
दिंडोरी- धनराज महाले