fbpx

अर्थसंकल्प फुटला, या हलगर्जीपणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – राष्ट्रवादी

टीम महाराष्ट्र देशा : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामुळे विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांचा अवमान झाला आहे. असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे.

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करत आहेत, दरम्यान एका बाजूला अर्थसंकल्प सादर होत असताना दुसरीकडे अर्थमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंटवर काही क्षणांत ग्राफिक्स इमेज पोस्ट होत होत्या, त्यामुळे अर्थसंकल्प आधीच फुटल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला.

इतकेच नव्हे तर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामुळे विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहांचा अवमान झाला आहे. या हलगर्जीपणाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसने म्हंटले आहे.