घरातच राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिला मुख्यमंत्र्यांना धक्का !

cm fadnvis

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस ने घरातच धक्का दिला आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाची पताका मिरवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातच राष्ट्रवादी पुरस्कृत महिला सरपंचपदी विराजमान होत आहे.

राष्ट्रवादीनं पुरस्कृत केलेल्या धनश्री टोमणे या फेटरी गावाच्या सरपंच झाल्या आहेत. नागपुरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांना मोठा झटका मिळाला आहे.
या गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपनं जिंकल्या आहेत, तर चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजेतेपद मिळालं. मात्र सरपंचपद भाजपच्या हातून निसटलं आहे.