fbpx

भोपाळमध्ये साध्वीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्टार प्रचारक मैदानात

टीम महाराष्ट्र देशा : आपल्या विविध वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. चौफेर टीका झाल्यावर साध्वीला या प्रकरणात माफी देखील मागावी लागली होती. विरोधकांनी या मुद्द्याचे मोठे भांडवल केले होते आणि भाजपवर टीकास्त्र सोडले होते.

दरम्यान, साध्वीला सुरु असणाऱ्या विरोधाची धार आणखी वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड भोपाळमध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे सुद्धा भोपाळमध्ये जाऊन साध्वींविरोधात प्रचार करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळही मध्यप्रदेशमध्ये झंझावाती प्रचार करणार आहेत. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेला ते संबोधित करणार आहेत.