हाफ पँट-स्लीपर घातलेल्या तरुणांना बाहेर काढणाऱ्या ‘त्या’ रेस्टॉरंटला शिकवला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने धडा

पुणे- पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील ‘एजंट जॅक’ या रेस्टॉरंटमधून हाफ पँट आणि स्लीपर घातलेल्या तरुणांना बाहेर काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काल समोर आला होता. या प्रकारा नंतर एकच खळबळ उडाली होती. रेस्टॉरंटमध्ये जातांना कोणते कपडे परिधान करायचे असे प्रश्न सामान्यांना पडू लागला होता मात्र आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या आंदोलनानंतर अखेर या रेस्टोरंटचालकांनी हा नियम रद्द केला आहे.

Loading...

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमध्ये हे रेस्टॉरंट असून काही तरुण मंगळवारी रात्री जेवण्यासाठी या रेस्टॉरंटमध्ये आले. त्यावेळी या मुलांनी हाफ पँट आणि पायात स्लीपर घातल्याचे कारण पुढे करत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याबाबत आपण आपल्या रेस्टॉरंटमध्ये नियमावलीही लावली असल्याचे रेस्टॉरंटच्या संचालकाने सांगितले. तुम्ही केलेला वेश आमच्या हॉटेलमधील सुविधा घेण्यास योग्य नसल्याने तुम्हाला प्रवेश नाकारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे सगळे तरुण इंजिनियर असून ते नामांकित आयटी कंपनीमध्ये नोकरी करतात. याबाबत तरुणांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. संबंधित हॉटेल चालकांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी या तरुणांनी केली होती.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी आज हाफ पँट आणि स्लीपर घालून ‘एजंट जॅक’ या रेस्टॉरंट दाखल झाले व याच ठिकाणी त्यांनी हे आंदोलन केले. हाफ पँट आणि स्लीपर घालून कोणीही आले तर तुम्हाला नेमका काय प्रोब्लेम आहे असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष राकेश कामठे यांनी रेस्टॉरंट प्रशासनाला जाब विचारला.

आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून रेस्टोरंट प्रशासनाने आपला लेखी माफीनामा सादर केला. तसेच काल ज्या तरुणांना रेस्टोरंट मधून बाहेर काढले होते त्यांची सुद्धा माफी मागितली. यापुढील काळात कोणत्याही हॉटेलमध्ये असे जाचक आणि भेदभाव करणारे नियम असतील तर आम्ही असेच आंदोलन करून मुजोर हॉटेलचालकांना धडा शिकवू असा इशारा कामठे यांनी यावेळी दिला.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या बूथ तिथे शाखेचा दुसरा टप्पा पूर्ण

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा १ फेब्रुवारीला सांगलीत ‘युवा आक्रोश मोर्चा’

NCP- राष्ट्रवादीने वाजवले फडणवीस तावडेंचे ‘ढोल’

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...