जगताप, मानकर की खासदार वंदना चव्हाण यांना पुन्हा संधी ?, राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा शोध संपेना

collage mankar, subhash jagtap, prashant jagtap and vandana chawan

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुणे शहराध्यक्ष पदासाठी सध्या नवीन चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. मागील आठवड्यात  प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवेळी शहराध्यक्षांच नाव देखील जाहीर केल जाणार असल्याच सांगितल गेल. मात्र, तीन वेळा मुहूर्त टळूनही अद्याप पक्षाला हवा असलेल्या चेहऱ्याचा शोध सुरूच आहे, त्यामुळे गेली ९ ते १० वर्षे सक्षमपणे शहराध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या खासदार वंदना चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१० वर्षांच्या सत्तेनंतर मागील वर्षी झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन शहराध्यक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यावेळी पालिकेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत खा चव्हाण यांनी पदाचा राजीनामा सोपवला होता. मात्र, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी चव्हाण यांनाच कायम ठेवले. आता राज्यभरातील पक्ष संघटनेत बदल केले जात असताना शहराध्यक्ष पदासाठी पुन्हा एकदा नवीन चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे.

Loading...

अध्यक्षपदासाठी सध्या  सोळाजण इच्छुक असल्याच कळतयं, यामध्ये माजी महापौर प्रशांत जगताप, माजी सभागृह नेते सुभाष जगताप आणि माजी उपमहापौर दीपक मानकर हे आघाडीवर आहेत. तसेच शहरातील काही जेष्ठ नेते देखील रेसमध्ये असल्याच दिसत आहे. प्रशांत जगताप यांनी महापालिकेतील सत्ताकाळाच्या शेवटच्या टप्प्यात चमकदार कामगिरी केली आहे. अनेकवेळा त्यांनी थेट पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर टीका करत त्यांना धारेवर धरल. तर दीपक मानकर यांचा दांडगा जनसंपर्क त्यांच्या जमेची बाजू आहे. सामन्यांतील चेहरा समजले जाणारे सुभाष जगताप यांना देखील संधी मिळू शकते.

खासदार वंदना चव्हाण यांची प्रथम २००८ -०९ मध्ये अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा संधी देण्यास पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. मात्र, अंतर्गत विरोधाकडे दुर्लक्ष करत शरद पवार यांनी चव्हाण यांनाच कायम ठेवले. तर नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत विश्वास दाखवत पुन्हा एकदा पक्षाने त्यांना खासदार केले आहे. गल्ली ते दिल्लीच्या राजकारणाची असणारी जाण, अभ्यासू आणि संयमी स्वभाव, सर्वसमावेश चेहरा या गोष्टी वंदना चव्हाण यांच्या जमेच्या बाजू आहेत.  पूर्व इतिहास आणि नवीन शहराध्यक्ष निवडीसाठी लागणारा विलंब पाहता वंदना चव्हाण यांना पुन्हा नव्याने संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार यावर  ९ आणि १० मे रोजी होणाऱ्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती, पक्षातील सूत्रांनी दिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
भाजपच्या धास्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले ; सरकारमधील दोन नेत्यांचे राजीनामे
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला