बीडमध्ये राष्ट्रवादीकडून इट का जवाब पत्थर से, संदीप क्षीरसागरांसह समर्थक आक्रमक

बीड : दै.सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अग्रलेखातून टीका करताना अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरण्यात आली होती. त्या अग्रलेखाचे पडसाद सोमवारी (दि.29) बीडमध्ये दिसून आले. राष्ट्रवादीचे संदिप क्षीरसागर यांच्यासह समर्थकांनी उद्धव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देत नगर रोडवरील शिवाजी चौकात उद्धव ठाकरे यांचा साडी-चोळी घातलेला पुतळा जाळला. यावेळी संदिप क्षीरसागर यांनी पुतळ्याला कोल्हापुरी चप्पलचे फटके मारुन सदर लेखाचा निषेध केला. यावेळी प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणूण गेला होता.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात शनिवारी (दि.27) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका करण्यात आली होती.ही टिका करतांना वापरलेली भाषा प्रचंड हिन दर्जाची व पातळी सोडून केलेली होती. यामुळे राज्यभरात राष्ट्रवादीकडून तसेच सुजान वाचकांकडून या अग्रलेखाचा निषेध नोंदवण्यात आला होता. या लेखाचा बीड जिल्ह्यातही सामना वर्तमान पत्राची होळी करुन निषेध नोंदवण्यात आला होता. परंतू सोमवारी (दि.29) सकाळी बीड जिल्हा शिवसेनेकडून अजित पवार यांचा शिवाजी चौकात पुतळा जाळण्यात आला. या घटनेने राष्ट्रवादीचे युवा नेते तथा जि.प.सदस्य संदिप क्षीरसागर यांनी जशास तसे उत्तर देत आक्रमक भुमिका घेतली.

सकाळी आकरा वाजता शिवसेनेने केलेल्या कृतीला संदिप क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी ‘इट का जवाब पत्थरसे’ म्हणत उध्दव ठाकरे मुर्दाबादच्या घोषणा देत कोल्हापुरी चपलांचे फटके मारत ठाकरे यांचा साडी घातलेला पुतळा जाळला. नगर रोडवरील शिवाजी चौकात दुपारी अडीच वाजता उद्धव ठाकरे यांच्या साडी घातलेल्या पुतळ्याला जोडे मारुन दहन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे मुर्दाबाद… अशा घोषणांनी परिसर दणाणूण गेला होता. यावेळी राष्ट्रवादीचे युवानेते संदिप क्षीरसागर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष बबन गवते, भाऊसाहेब डावकर, दिलीप भोसले, नगरसेवक अमर नाईकवाडे, पं.स.सदस्य तथा गटनेते बळीराम गवते, पंकज बाहेगव्हाणकर, रमेश चव्हाण, नगरसेवक बाळासाहेब पोपळे, भैय्यासाहेब मोरे, रणजित बनसोडे, विशाल घाडगे, झुंजार धांडे, पं.स. सदस्य मोहन देवकते आदींची उपस्थिती होती.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने केली ‘सामना’ वृत्तपत्राची होळी