fbpx

महागाई विरोधात राष्ट्रवादी युवकांची सायकल रैली तर महिलांचा ‘चुलीवर’ स्वयंपाक

pune ncp protest ncp protest againt inflation

देशातील वाढती महागाई. गॅस-पेट्रोलचे गगनाला भिडलेले दर यामुळे सामान्य जनतेच कंबरड मोडल्याच चित्र सध्या पहायला मिळत आहे. याच महागाई विरोधात आज पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आल आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या कसबा पेठेतील कार्यालयसमोर चूल मांडत आनोख आंदोलन केल आहे. तर युवक आघाडीच्या वतीने शहराध्यक्ष राकेश कामठे यांच्या नेतृत्वात वाढत्या पेट्रोल दराच्या विरोधात सायकल रैली काढत निषेध नोंदवण्यात आला. या रैली दरम्यान युवक पदाधिकाऱ्यांनी अंगावर घातलेले निषेधाचे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी शहराध्यक्षा खा.वंदना चव्हाण म्हणाल्या कि, ‘ सरकारने सत्तेवर येताना देशातील जनतेला महागाई आटोक्यात ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सध्या सरकारकडून रोजच जीवनावश्यक गोष्टींचे भाव वाढवले जात आहेत. यामुळे सामान्य नागरीकांच एकवेळच जेवणही महाग झाले आहे. सरकार महागाई कमी करण्याकडे लक्षतर देतच नाही. मात्र, त्यांचे मंत्री सामान्य नागरिकांची चेष्टा करणारी भाषा वापरत आहेत.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्षा खा.वंदना चव्हाण, महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक शहराध्यक्ष राकेश कामठे, माजी नगरसेवक बाळासाहेब बोडके, रवींद्र माळवदकर. तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते