fbpx

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : राष्ट्रवादीने दिलेला ‘हा’ प्रस्ताव कॉंग्रेसला मान्य होईल का ?

टीम महाराष्ट्र देशा- मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून लोकसभा निवडणुकांच्या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी राष्ट्रवादीने 50-50 टक्के जागावाटपाचा फॉर्म्युला ठेवला आहे. त्यावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली नाही. आता काँग्रेस काय निर्णय घेणार याची आम्हाला प्रतीक्षा आहे असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले आहे.

गुरुवारी दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गहलोत आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीबाबत सध्या प्राथमिक चर्चा झाली आहे. इतर पक्षही आमच्या सोबत आहेत त्यांच्यासोबतही आम्ही चर्चा करतो आहोत असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान,काँग्रेसने 2014 लोकसभा निवडणुकीत राज्यात 26 जागांवर आपले उमेदवार दिले होते, त्यापैकी केवळ दोन विजयी झाले होते. तर राष्ट्रवादीने 22 जागांवर आपले उमेदवार दिले होते, त्यापैकी चार उमेदवार विजयी झाले होते.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं ! विखे पाटलांच्या घरी झालेल्या बैठकीत आघाडी निश्चित