३२ वर्षानंतर शरद पवार उतरणार रस्त्यावर; नागपूरमध्ये आज ‘हल्लाबोल आंदोलन’

आज राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा ७७ वा वाढदिवस

टीम महाराष्ट्र देशा: नागपूरमध्ये सध्या विधानसभेच हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यातच कॉंग्रेसचे जवाब दो तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाने आधीच वातावरण तापवले आहे. आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून संयुक्त हल्लाबोल आंदोलन केले जाणार असून त्याचे नेतृत्व दस्तुरखुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार हे करणार आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांचा आज ७७ वा वाढदिवस असून ते ३२ वर्षांनंतर प्रस्थापित सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.

काल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्याच पहायला मिळाले. शेतकरी कर्जमाफीतील ऑनलाईन घोळ, कापसावरील बोंड आळीमुळे अडचणीत आलेला विदर्भातील शेतकरी आणि सरकारकडून केली जाणारी जाहिरातबाजीवर विरोधीपक्ष नेत्यांनी कडाडून टीका केली.

You might also like
Comments
Loading...