राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

टीम महाराष्ट्र देशा: आज रात्री मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची होणार भेट, रात्री साडे आठ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे ही भेट होणार आहे. MCA च्या संदर्भात ही बैठक असल्याचं सूत्राकडून सांगण्यात येत आहे. पण येत्या 7 तारखेला होणाऱ्या विधान परिषद पोटनिवडणुकीच्या दृष्टीने हि भेट महत्वाची मानली जात आहे.

दरम्यान, नुकतेच अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांनी एकाच विमानातून आणि त्या नंतर एकाच गाडीतून प्रवास केला होता. त्यामुळे सरकार तारणारे अदृश्य हात पवारांचे तर नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत.