आर्थिक मागास शेतकऱ्यांना आरक्षण द्या; शरद पवार यांची मागणी

pawar press conference mumbai

मुंबई: आज ८२ टक्के लोकांकडे आज २ २ एकरपेक्षा कमी शेती उरलेली आहे. तर ७० ते ७२ टक्के शेतजमीनीला पाणी मिळत नाही. त्यामुळे आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास  मागास असणाऱ्या शेती हाच व्यवसाय करणाऱ्यांना शेतकरी म्हणून आरक्षण देण्यात याव अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. मात्र हे आरक्षण देताना मागास शेतकऱ्यांनाच आरक्षण देण्यात याच सधन वगैरे शेतकऱ्यांना नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्य सरकारने कोणतीही पूर्व तयारी न करता शेतकरी कर्जमाफी दिली त्यामुळे दिवसेंदिवस लाभार्थी तसेच निधी कमी होत असल्याची टीका यावेळी शरद पवार यांनी केली. यावेळी बोलताना राज्यात बंद करण्यात येणाऱ्या मराठी शाळांवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काल जाहीर केल्याप्रमाणे १३०० ऐवजी ३४४ मराठी शाळा बंद करणार असल्याचे कळते. माझ्या मते, एकही शाळा बंद केल्यास विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. या राज्याला असलेली शिक्षण महर्षी व शिक्षण प्रसारकांची मोठी परंपरा शिक्षणमंत्र्यांनी ध्यानात ठेवावी.

Loading...

राष्ट्रीयकृत बँकांच्या नोटा बदलून दिल्या गेल्या. मग जिल्हा बँकांच्या का नाही
नोटबंदीच्या काळामध्ये जिल्हा बँकामध्ये जमा करण्यात आलेली काही रक्कम रिजर्व्ह बँकेकडून बदलून देण्यात आली. मात्र, शिल्लक असणाऱ्या नोटा आता स्वीकारल्या जाणार नसून बँकांनी ती रक्कम तोटा म्हणून दाखवावी केंद्र सरकारकडून आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक, वर्धा, यवतमाळ, अहमदनगर, अमरावती अशा जिल्हा बँकांच्या मिळून ११२ कोटींच्या ठेवी आता बुडीत निघाल्या असल्याचही पवार यांनी सांगितले. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना याचा फटका बसणार असून एकंदरीत सरकारचा सामान्य जनतेप्रती असलेला दृष्टिकोन यातून दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
राष्ट्रवादी-मनसेचे कार्यकर्ते भिडले