राष्ट्रवादी कॉंग्रेस सातारचा उमेदवार बदलणार ?

sharad pawar, sikkim governor shrinivas patil and mp udyanraje bhosle

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी काल त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास बंददार चर्चा झाली. त्यानंतर आता या भेटीवरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. काहींच्या मते ही भेट म्हणजे सातारा लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार बदलाची चाचपणी आहे.

लोकसभेची निवडणूक एक वर्षभरावर आली असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारसंघ निहाय आढावा घेण्याचे काम सुरु झाल्याच दिसत आहे. खासदार उदयनराजे भोसले हे सध्या सातारा लोकसभेच प्रतिनिधत्व करतात. २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत राष्ट्रवादीचे अवघे चार खासदार निवडून आले. यामध्ये उदयनराजे भोसले हे विक्रमी मतांनी निवडून आले आहेत.

उदयनराजे भोसले यांचा सातारा जिल्ह्यात असणारा दांडगा जनसंपर्क आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद यासाठी कारणीभूत आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याशीं त्यांचं फारसं पटत नाही. शिवेंद्रराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर तसेच अजित पवारांशीही त्यांचं फारसं पटत नाही. उदयनराजे यांनी अनेकवेळा पक्षविरोधी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीची अडचण झाल्याच दिसून आल आहे. याच सर्व गोष्ठी लक्षात घेता त्यांच्याऐवजी दुसरा तगडा उमेदवार देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात आल्याच बोलल जात आहे. या सर्व गोष्ठी लक्षात घेता काल पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीबाबत चाचपणी केल्याच दिसत आहे.

श्रीनिवास पाटील हे शरद पवार याचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जातात. तसेच त्यांचे स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांशी असणारे संबंध देखील एक जमेची बाजू आहे. मात्र, उदयनराजे यांच्या सारख्या ताकदवर नेत्याला डावलण राष्ट्रवादीसाठी महागात पडू शकते याची कल्पना नक्कीच पवार यांना आहे. त्यामुळे ते नक्की काय निर्णय घेणार हे पाहन महत्वाच ठरणार आहे.