कोरोना लसीकरणाची मनपाकडून जय्यत तयारी

औरंगाबाद – औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत कोविड लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी महानगरपालिकेची तयारी पूर्ण अंतिम टप्प्यात सुरू आहे. लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्या विविध घटकांचे प्रशिक्षण सुरू आहे. मंगळवारी लसीकरण मोहिमेत सहभागी होणाऱ्या सर्व व्हेक्सिनेटर यांचे प्रशिक्षण महापालिकेत प्रबोधनकार सिताराम ठाकरे सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. मनीषा भोंडवे यांनी प्रशिक्षण दिले.

शहरात मनपा हद्दीतील सात बूथवर लसीकरण होईल. पुण्याहून आधी या लसी रात्री पोहोचतील, अशी माहिती आरोग्य यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार लसीचा साठा ठेवण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले होते; परंतु त्यानंतर लस सकाळपर्यंत दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार या लसींचा साठा ठेवण्यासंदर्भात अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.

मागील ९ महिन्यांपासून शहरवासीयांचा कोरोनाशी लढा सुरू आहे. लसीची प्रतिक्षा अखेर संपली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजून ५८ मिनिटांनी कोरोनाच्या ६४ हजार लसी औरंगाबाद शहरात दाखल झाल्या.

महत्वाच्या बातम्या