‘वादळाच्या संकटकाळी प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उभं रहावं’

sharad pawar

पुणे – कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दारावर आले असून चक्रीवादळानं बुधवारी दुपारी एक वाजता जमिनीला स्पर्श केला. वाऱ्याचा वेग वाढत आहे. किनारपट्टी परिसरात पाऊसही कोसळत आहे. या वादळाचा मुंबई, रायगड, रत्नागिरीसह अनेक भागाला तडाखा बसणार आहे.

दरम्यान, या वादळाचा प्रकोप कोकणातील प्रदेशांसह नाशिक, पुणे या भागांना देखील जाणवणार आहे. सध्या किनारपट्टी भागात ताशी १०० हून अधिक वेगाने वारे वाहत आहेत. ज्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडत आहेत. रत्नागिरीत तर काही घरांवरील पत्रेही उडून जात आहेत. सध्या या वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागर इथून राज्यात एन्ट्री केली आहे.

या वादळामुळे कच्ची घरे आणि झोपड्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक भागात घरावरची पत्रे उडून गेली आहे. तर काही ठिकाणी वीज आणि दूरध्वनी तसेच संपर्क साधनांच्या तारांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी, अलिबाग परिसरात मोठ-मोठी झाडे, उन्मळून पडली आहे.याचा सर्वाधिक परिणाम हा रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, दिवे-आगार, अलिबाग, मुरुड येथील किनारपट्टी भागाला बसला आहे. या वादळावर सॅटेलाईटच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उभं रहावं असं, आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. प्रशासन सतर्क राहून काम करत आहेच. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही प्रशासनासोबत मदतीला उतरण्याचं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

महाराष्ट्राच्या मदतीला धावला केरळ, डॉक्टर्स आणि नर्सेस मुंबईत दाखल

लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेलेल्यांसाठी आता मनसे मैदानात…

कोरोनाचा धोका लक्षात घेता एनडीआरएफच्या आपत्ती निवारण प्रक्रियेच्या नियमावलीत सुधारणा