नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मलिकांचा टोला

नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर मलिकांचा टोला

Nawab Malik and Narayan Rane

मुंबई: एखादं सरकार पाडायचं असेल आणि नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. महाविकास आघाडी सरकारचं आयुष्य लवकरच संपणार आहे, अशी भविष्यवाणी भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसत आहे. जेव्हा पासून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे तेव्हा पासून भाजप पक्षाने अनेकवेळा हे सरकार पडणार असल्याचे भाकीत केले आहे, मात्र अद्यापही हे सरकार पडले नाहीये.

दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्याची आणखी एक डेडलाईन दिली आहे. त्यावरून त्यांच्यावर राजकीय वर्तुळात टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक यांनी ट्विटरद्वारे ट्विट करत नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक म्हणाले, काही लोकांकडे २३ वर्षात नावसच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावंच लागतंय, अशा शब्दात त्यांनी थेट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोला लगावला आहे. त्याच सोबत हे महाविकास आघाडी सरकार खंबीर सरकार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. लवकरात लवकर महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत येईल, असे भाकीत नारायण राणे यांनी केले होते.

महत्वाच्या बातम्या: