ब्रेंकिंग: अखेर खासदार उदयनराजे भोसले यांना अटक

वेबटीम :  आज सकाळी खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या कार्यकर्त्यांसह सातारा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली . आता उदयनराजे यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता थोड्याच वेळात उदयनराजे यांना न्यायलयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान उदयनराजे यांना अटक झाल्याच्या बातमीने सातारा शहर बंदची हाक पुकारण्यात आली आहे. सातारकरांनी उस्फुर्तपणे बंद पाळत राजेंच्या अटकेचा निषेध नोंदवला आहे.

आज सकाळी उदयनराजे कार्यकर्त्यांसह सातारा पोलिस स्टेशनमध्ये दाखल 

काय आहे प्रकरण ?
लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे.

उदयनराजे यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. पण हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं.

उदयनराजेंची अटक खपवून घेणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर पेटून उठू आणि रस्त्यावर येऊ – भिडे गुरुजीं

 

 

You might also like
Comments
Loading...