राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का; ‘हा’ दिग्गज खासदार भाजपच्या वाटेवर ?

ncp

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय दौरे, मोर्चेबांधणी यांसारख्या घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वारे फिरेल तसे नेते मंडळी पक्षांतर करत आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. दरम्यान खा. उदयनराजे भोसले हे पूरग्रस्त भागातल्या मदत आणि पुनर्वसन कार्याला वेग देण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती आहे.

या भेटी दरम्यान बोलताना उदयराजे भोसले म्हणाले, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती संदर्भात ही भेट घेण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली भागातील नागरिकांना लवकरात लवकर त्या ठिकाणचे पंचनामे करून भरपाई मिळावी. याचप्रमाणे लोकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, अशी उदयराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली.

दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठोपाठ उदयराजे भोसले हाती कमळ घेणार का ? हे पाहणे औचित्याचे ठरेल. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या