सुप्रिया सुळेंच ‘सेल्फी विथ खड्डा’; चला मंत्र्यांना खड्डे दाखवूया!

पुणे: राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करू म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा अस आवाहन केलं होत. मात्र भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण झाली तरी राज्यातील रस्त्यांची परिस्थिती सुधारलेली नाही. आता या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘सेल्फी विथ खड्डा’ हे अभियान सुरु केलं आहे.

Loading...

आज स्वत सुप्रिया सुळे यांनी कात्रज -उंड्री बायपास आणि बोपदेव घाट परिसरात खड्यासोबत सेल्फी काढत ते फोटो फेसबुक आणि ट्विटर वर पोस्ट करत चंद्रकांत पाटील यांना ट्विट केले आहेत.Loading…


Loading…

Loading...