पंतप्रधान पाकिस्तानात केक खायला जातात. मात्र तणाव मिटवण्याची साधी चर्चाही नाही

सुप्रिया सुळे

सटाणा: पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या हल्ल्यात सीमेवर तरुण सैनिक रोज शहीद होत आहेत. दोन देशांतील प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध नाही तर चर्चा हा उपाय आहे. मात्र आपले पंतप्रधान पाकिस्तानात केक खायला जातात पण दोन्ही देशातील तणाव मिटवण्यासाठी साधी चर्चाही करत नसल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार सुप्रिया सुळे सुळे यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रेच आयोजन करण्यात आल आहे. आज नाशिकमधील सटाणा येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या.

प्रगत भारतासाठी डिजिटल इंडिया हा झालाच पाहिजे. पण हे होताना लोकांच्या पोयाला अन्न मिळनही जास्त गरजेच आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्याला मदत करण्याची गरज असल्याचही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.