केंद्रीय अर्थसंकल्पात केवळ मोठ-मोठे आकडेच; हा तर ‘भ्रम’संकल्प – सुप्रिया सुळे

Narendra-modi-vs supriya-sule-

टीम महाराष्ट्र देशा: वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज मोदी सरकारचा शेवटचा आणि महत्वपूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे नवीन भारताचा संकल्प असल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे. मात्र राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी हा तर ‘भ्रम’संकल्प असल्याच ट्विट करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.

अर्थसंकल्पात बड्या कर्जबुडव्यांच्या थकीत कर्जवसुलीसाठी काहीही नाही, तसेच दिवसेंदिवस वाढत जाणारे पेट्रोलचे भाव कमी करण्यासाठी देखील काहीही नसल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. हे बजेट शेती आणि शेतकऱ्यासाठी असल्याच वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भाषणात सांगितले, याचाही समाचार घेत शेतीला कर्ज मिळण्याठी काही सोय करण्यात आली नाही केवळ मोठ्ठे मोठ्ठे आकडे दाखवायचे आणि पैसे वाटायची वेळ आली की कागदपत्रात अडकवल जात असल्याचेही सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहील आहे.

2 Comments

Click here to post a commentLoading…
Loading...