हागणदारीमुक्तवरून सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर ‘हल्लाबोल’

सुप्रिया सुळे, मुख्यमंत्री

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा नुकतीच केली. मात्र, फडणवीस हे खोटे बोलत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. यातच आता मुख्यमंत्री हे रस्त्याने नाही तर हेलिकॉप्टरने फिरत असल्याने खाली काय आहे ते त्यांना कळत नसल्याची खसरमरीत टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज तळजाई टेकडी येथे नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या. मुख्यमंत्र्यांची घोषणा म्हणजे दुरून डोंगर साजरे असल्यासारखी आहे. राज्यात सर्वप्रथम हागणदारीमुक्त ही योजना आर आर पाटील यांनी सुरू केली होती. काही ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत तर पाणी नाही अशी परिस्थिती असल्याची टीकाही सुळे यांनी यावेळी केली.