तुमच्या धमक्यांना मी घाबरत नाही; जी चौकशी करायची ती करा – सुप्रिया सुळे

नागपूरमध्ये खासदार सुप्रिया सुळेचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

नागपूर: आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतो मात्र मुख्यमंत्र्यांना आमचे अश्रू मगरीचे वाटत असतील तर त्यांनी हेलिकॉप्टरमधून खाली उतरावे, आणि सामान्य लोकांमध्ये फिराव मगच त्यांना सामन्यांचे अश्रू दिसतील. ते गेली तीन वर्षे झाले आमची चौकशी केली जाणार असल्याच बोलत आहेत. त्यांना जी चौकशी करायची ती त्यांनी करावी, आम्ही तुमच्या धमक्यांना घाबरत नाहीत म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला आहे.

हल्लाबोल आंदोलन करणाऱ्यांचे ‘डल्लामार’ पुरावे सभागुहात मांडणार असल्याच म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांवर निशाना साधला होता. याला सुप्रिया सुळे यांच्याकडून आक्रमकपणे प्रतिउत्तर देण्यात आले आहे. नागपूरमध्ये आज सरकार विरोधात हल्लाबोल आंदोल केले जाणार आहे. त्यापूर्वी सुळे यांनी चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेतले .

You might also like
Comments
Loading...