कहर झाला ! आता अजित पवारांचा सगळ्यात जवळचा सहकारी शिवसेनेत ?

टीम महाराष्ट्र देशा: माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे खा. सुनील तटकरे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले आहे. सुनील तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्याचं बोललं जात आहे. ‘न्यूज १८’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार आहेत. तसेच अजित पवार यांचे विश्वासू म्हणून त्यांना ओळखले जाते. तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास राष्ट्रवादीला धक्का बसणार आहे.

Loading...

सुनील तटकरे यांचा कोकणातील रायगड जिल्ह्यात मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने कोकणात शिवसेनेला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांनी वृत्ताचे खंडन केले आहे. मात्र पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचं पुढे आले आहे.

उदयनराजे, रामराजे, महाडिक भाजपच्या वाटेवर

आजवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असणाऱ्या छत्रपतींच्या वारसदारांना पक्षात घेण्यासाठी भाजप नेते आग्रही आहेत. मागील आठवड्यात शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रवेशानंतर आता खा. उदयनराजे भोसले, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
तानाजी चित्रपटातील 'तो' आक्षेपार्ह भाग वगळावा; नाभिक समाजाची मागणी
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले