औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं – खा. कोल्हे

blank

टीम महाराष्ट्र देशा: पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील ऐतिहासिक गढ किल्ले हॉटेल्स आणि लग्नसमारंभासाठी तसेच करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाऊ शकतात.

सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाला गडप्रेमी आणि विरोधकांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवल, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. सरकारने शिवरायांच्या मावळ्यांनी जिथे रक्त सांडत बलिदान केलं अशा २५ किल्ल्यांचे हॉटेल व डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा घाट घातलाय. हे संतापजनक व निषेधार्ह आहे. आम्ही कदापि हे होऊ देणार नाही, असा इशारा देखील कोल्हे यांनी दिला आहे.

मनसे नेते अनिल शिदोरे यांनी देखील सरकारच्या निर्णयावर संतात व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातले २५ गढ-किल्ले आता हॉटेल्स आणि लग्नसमारंभासाठी तसेच करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय वाचला आणि संताप अनावर झाला.. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा दैदिप्यमान इतिहास हा आमचा फार मोठा ठेवा आहे, त्याचा बाजार करू नका. अशी टीका शिदोरे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या