”बहुमत मिळाले मस्त..कारभार तुमचा सुस्त”: पुण्यात राष्ट्रवादीचे भाजप विरोधात आंदोलन

पुणे : गल्ली ते दिल्ली सर्व ठिकाणी भाजपची सत्ता आहे. तेच चित्र पुणे महापालिकेतही आहे. मात्र गेल्या सहा महिन्यापासून पूर्ण बहुमत असतानाही भाजपने पुण्याचा विकास केला नसल्याचा आरोप करत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आल आहे.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी शहराध्यक्षा खा.वंदना चव्हाण यांनी सत्ताधारी भाजपच्या कारभारावर हल्लाबोल केला. ‘पुणे शहरात दोन खासदार, आठ आमदार आणि तब्बल 98 नगरसेवक असतानाही भाजपला विकास करता आला नसल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान या आंदोलना वेळी राष्ट्रवादीकडून महापालिका परीसरात पुणेरी स्टाईलने वेगवेगळे फ्लेक्स लावण्यात आले होते. भाजपच्या कारभारावर उपरोधिक टीका करणारे हे बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

Loading...

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, महिला आघाडी शहराध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच महापालिकेतील नगरसेवक उपस्थित होते.

2 Comments

Click here to post a comment