शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे आमदार आजही आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

नागपूर   – कधी देणार कधी देणार…कापूस,धानाला मदत कधी देणार…आदिवासी विदयार्थी अन् पत्रकारांवरील दडपशाहीचा निषेध असो…शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.

bagdure

आज सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होण्याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी एकत्रित येत सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यावर जोरदार आंदोलन केले.त्यामुळे आज जनतेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक राहणार असे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार प्रदीप नाईक, आमदार विजय भाबळे, आमदार संजय कदम, आमदार विक्रम काळे आदींसह काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील आणि आमदार उपस्थित होते.

You might also like
Comments
Loading...