Winter Session 2022 | नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवशेन आजपासून सुरु झाले आहे. नाशिकच्या (Nashik) देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) या चर्चेच्या विषय ठरल्या आहेत. कारण अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन त्या अधिवेशनात आल्या आहेत. आपल्यासाठी हा सुखदः क्षण असल्याचे आमदार अहिरे यांनी सांगितले.
मी आमदार आहे आणि आता आईही झाले. त्यामुळे दोन्ही कर्तव्य बजावणे माझं काम आहे, असं सरोज अहिरे म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, “एक आई म्हणून बाळाची काळजी घेतेय. तर एक आमदार म्हणून मतदारांना न्याय मिळावा म्हणून अधिवेशनात सहभागी व्हायला आलेय.”
त्याचबरोबर विधानभवन परिसरात फिडिंग रुम किंवा हिरकणी कक्ष व्हावा, अशी मागणी सरोज अहिरे यांनी केलीय. वातावरण कसंही असलं तरी शिंदे सरकार असो किंवा ठाकरे सरकार असो शेवटी मतदारसंघातील प्रश्न सोडवणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी वातावरण कसंही असलं तरी आपले प्रश्न मांडण्यासाठी यावं लागतं, असंही त्यांनी सांगितलं.
सरोज अहिरे पुढे म्हणाल्या, “देशासह जगभरात अनेक महिला आहेत, ज्या दोन्ही गोष्टी सांभाळून आपले कर्तव्य निभावत आहेत. प्रशंसक हा केवळ अडीच महिन्यांचा असून माझ्याशिवाय तो राहू शकत नाही. म्हणून त्याला इथे घेऊन आलेलो आहे, जेवढे शक्य असेल तेवढे अधिवेशन अटेंड करून मतदारसंघासाठी न्याय मागण्यासाठी इथे आलेली आहे. स्वतःला नशीबवान समजेल आणि माझ्या बाळाला पण की इतक्या पवित्र इमारतीमध्ये त्याचं पहिलं पाऊल म्हणजे घरातून त्याला पहिल्यांदाच बाहेर काढले आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Winter Session 2022 | गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर सुद्धा कर्नाटक सरकारची मुजोरी कायम ; सीमाप्रश्नावर अजित पवार आक्रमक
- Dhairyasheel Mane | “काहीही झालं तरी बेळगावला जाणारच”; धैर्यशील माने यांची ठाम भूमिका
- Winter Session 2022 | ‘राष्ट्रवादीच्या आमदाराला नक्षलवाद्यांकडून धमकी’, अजित पवारांच्या मुद्द्यावर फडणवीस सतर्क
- Ajit Pawar | “अमित शाह आणि बोम्मईंसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं ते जाहीर करा”; अजित पवार यांची मागणी
- Winter Session 2022 | तुम्हाला सरकारमध्ये संधी हवी का? विधानसभेत फडणवीसांचा सुनील प्रभूंना सवाल