रोहित पवार…. नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन

टीम महाराष्ट्र देशा : अगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावतीने मेधा युवा सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राज्यातल्या तरुण आमदारांसोबत संवाद साधण्यात आला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार आदिती तटकरे, काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी यांनी एकाच मंचावर हजेरी लावली आहे.

गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते हे तरूण आमदारांशी संवाद साधला. मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी आपल्या आवडत्या व्यक्तीला फोन लावण्याचा खेळ घेतला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन लावला. आणि लावल्याबरोबर माझं नाव रोहित पवार…. नाव तर तुम्ही ऐकलंच असेल…. असं म्हणत त्यांनी मोदींना बोलायला सुरूवात केली.

Loading...

नमस्कार मोदीसाहाब… मी रोहित पवार बोलतोय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. सरकार चांगलं काम देखील करत आहे. गेली 5 वर्ष विकास झाला नव्हता… तो नक्की आता होईल, एवढं आश्वासन देतो. तरूणांच्या हाताला काम कसं मिळेल याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे. तसंच केंद्राचं औद्योगिक धोरणं आपल्याला काही प्रमाणात बदलावं लागेल… ते बदलावं अशी आपल्याला विनंती करतो, असं रोहित म्हणाले.

मोदी साहेब चारच वर्ष राहिलीत आता तुमची… चांगलं लक्ष द्या आणि देशाची काळजी घ्या…. देशाच्या जनतेची काळजी घ्या, असा टोमणा मारत तुम्ही खूप व्यस्त असाल… माझं बोलणं मी आवरतं घेतो, असं म्हणत त्यांनी फोन कट केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण