fbpx

राष्ट्रवादीचे आमदार भिडे गुरुजींच्या वेशात ; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अनोखे आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु होत आहे. या अधिवेशनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शेतकरी आत्महत्या, शेतमालाला मिळणारा बाजार भाव, आणि राज्यभर मोठ्या प्रमाणावर गाजत असलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय या मुद्यांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे.

नुकत्याच कॉग्रेस ने केलेल्या भुखंड खोटाळ्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री चांगलेच अडचणीत सापडले आहेत. या सगळ्या मुद्यांवरून गदारोळ अपेक्षित असतानाच राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर होत नसलेल्या कारवाईचा निषेध म्हणून भिडे गुरुजींचा गणवेश परिधान करून अनोख्या पधतीन निषेध नोंदवला आहे.

आमदार प्रकाश गजभिये हे संभाजी भिडे गुरुजी यांचा गणवेश परिधान करून अधिवेशनाला हजर राहिले आहेत.