fbpx

स्क्रिप्ट लिहून दिली, तसा अण्णांनी उत्तम अभिनय केला- जितेंद्र आव्हाड

1 anna-hazare

महाराष्ट्र देशा: जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यावर पुकारलेले उपोषण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मागे घेतले. यानंतर अण्णा हजारे यांच्यावर अनेकांनी टीका केली. यामध्ये आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांची भर पडली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अण्णा हजारे यांचे उपोषण स्क्रिप्टेड असल्याची टीका केली आहे.

९२/९३ साली जसे अण्णा हजारे होते तसे ते आज ही आहेत, मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना २ शब्द ते बोलले नव्हते, २०१४ ते २०१९ अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर आली, मात्र अण्णा काही बोलले नसल्याची टीका आव्हाड यांनी केली आहे. तसेच आता त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली, त्यांनी उत्तम अभिनय केला आणि आपण मूर्खा सारखे चर्चा करतो. असा घणाघातही आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्याकडून अण्णा हजारे यांच्यावर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे संघाचे एजंट असल्याचं वक्तव्य केले होते. मलिक यांच्या विधानानंतर अण्णा हजारे आक्रमक झाले होते. शेवटी वादावर पडदा टाकण्यासाठी अजित पवार यांना जाहीर माफी मागावी लागली होती.