fbpx

सगळीकडे निष्ठेची विष्टा होतानाही मनसैनिक स्वामीनिष्ठा दाखवतायत – आव्हाड

jitendra awhad

टीम महाराष्ट्र देशा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्याने मनसैनिक आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने मानसिक तणावामधून एका मनसैनिकाने पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवीण चौगुले असे आत्महत्या करणाऱ्या मनसैनिकाचे नाव आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनसैनिक दाखवत असलेल्या पक्ष निष्ठबद्दल कौतुक केले आहे. एका बाजूला राज्यामध्ये सगळी कडे निष्ठेची विष्टा होताना दिसत असताना एक मनसैनिक निष्ठा दाखवत आपल्या नेत्यांसाठी आत्महत्या करतो, आत्महत्या करणे चूकच आहे. पण ह्या युगात इतकी स्वामीनिष्ठा, सलाम प्रवीण चौगुले, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.

कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

यामध्ये आता ठाण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवीण चौगुले नावाच्या तरुणानं स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उशीरा ठाण्यात घडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीनं नोटीस पाठवल्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत असं सांगून प्रवीणनं आत्महत्या केली असल्याचं त्याच्या मित्रांचं म्हणणं आहे.

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली आहे आणि त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार. यामुळे आपण दुःखावलो असून आत्महत्या करतोय असं वारंवार प्रवीण त्याच्या मित्रांना सांगायचा. एवढंच नाही तर मंगळवारी दिवसभर प्रविणने राज ठाकरे यांच्या समर्थनात आणि ईडी विरोधात अपशब्द वापरुन शंभर पेक्षा जास्त फेसबुक पोस्ट केल्या आहेत. पण पोलिसांकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नसून पोलीस तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या