आ. जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधान

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आक्रमक आमदार म्हणून प्रसिद्ध असणारे जितेंद्र आव्हाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी ही भेट झाली. अचानक झालेल्या आव्हाड – ठाकरे भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

काही महिन्यांपुर्वी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यामध्ये महामुलाखत घेतली होती. यानंतर राष्ट्रवादी आणि मनसे नेते कार्यकर्त्यांमध्ये जवळीक निर्माण होताना दिसत आहे. दरम्यान, ही राजकीय नसून वयक्तिक भेट असल्याच जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे. तसेच राज ठाकरे यांची स्तुती करत , ते महाराष्ट्राच्या राजकारणातील अभ्यासू नेते असून त्यांचे अष्टपैलु व्यक्तिमत्त्व वाखाणण्याजोगे असल्याच आव्हाड म्हणाले.