राष्ट्रवादीत राहणार कि शिवसेनेत जाणार, राष्ट्रवादीच्या जेष्ठ आमदाराचं आज ठरणार ?

blank

टीम महाराष्ट्र देशा: बार्शीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस आ. दिलीप सोपल यांनी आज कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे निर्धार मेळाव्याच्या पोस्टरवर कोठेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उल्लेख करण्यात आलेला नाही, त्यामुळे मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या सोपल यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस – राष्ट्रवादीमधील अनेक आमदार भाजप – शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. बार्शी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्र्वादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे, खुद्द सोपल यांच्याकडून चर्चेला कोणताही दुजोरा देण्यात आला नव्हता. मात्र आता येत्या महिनाभरात शिवसेनेत प्रवेश करायचं कि नाही, हा निर्णय घेणार असल्याचं आ. दिलीप सोपल यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

blank

आ. सोपल यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू मानले जाते, परंतु बदलत्या राजकरणात सोपल यांनी देखील राष्ट्रवादीला रामराम करण्याची तयारी चालवली आहे. मागील आठवड्यात १० ऑगस्ट रोजी ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र कोल्हापूर सांगलीमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीत पक्ष प्रवेश झाल्यास शिवसेनेसह आ. सोपल यांच्यावर देखील टीका होण्याची शक्यता असल्याने मुहूर्त टळाला होता.

महत्वाच्या बातम्या