राष्ट्रवादीकडून आमदार बाबाजानी दुर्राणी यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर…

नागपूर : आमदार बाबाजानी दुर्राणी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.बाबाजानी दुर्राणी यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये काम केले आहे. शिवाय ते सध्या परभणी जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष आहेत.

बाबाजानी दुर्राणी यांना विधानसभा सदस्याद्वारा निर्वाचितमधून उमेदवारीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घोषणा आज झाल्यानंतर ५ जुलै रोजी दुपारी १ वाजता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस आमदार सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद आमदार हेमंत टकले आदींसह पक्षाचे इतर नेते उपस्थित राहणार आहे.

आता मोदींची नाही, राष्ट्रवादीची लाट येईल – जयंत पाटील

माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरच्या विळख्यात…