अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारला धरले धारेवर…

मुंबई – राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाल्यापासून अनेक विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अधिवेशनामध्ये जनतेच्या समस्या आणि मागण्यांवर सरकारला जेरीस आणताना दिसत आहेत. आज आमदार प्रकाश गजभिये यांनी अंगणवाडी सेविकांना लावण्यात आलेला तीन अपत्याचा कायदा रद्द करण्याची मागणी केली तर आमदार विदया चव्हाण यांनी बालधोरण फक्त कागदावरच असून त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

Loading...

अंगणवाडी सेविकांना लावलेला तीन अपत्याचा कायदा रद्द करा –आमदार प्रकाश गजभिये
आमदार प्रकाश गजभिये यांनी राज्यात १ लाख ३ हजार अंगणवाडी असून २ लाख ६ हजार अंगणवाडी सेविका आहेत. अतिशय तुटपुंज्या मानधनात सेविका काम करत आहेत. त्याना ‘ना मान’, ‘ना धन’ मिळते. तीन-तीन महिने वेतन दिले जात नाही याकडे सरकारचे लक्ष वेधले.शिवाय त्यांनी तीन अपत्ये असणार्यांना निवडणूक लढवता येत नाही असा कायदा लोकप्रतिनिधींसाठी आहे. हा कायदा अंगणवाडी सेविकांना लावलेला असून तीन अपत्ये असणार्या ताईंना नोकरीतून कमी केले जात आहे. हा कायदा रद्द करावा अशी मागणी आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.

सरकारचे बालधोरण फक्त कागदावरच –आमदार विदया चव्हाण
तर आमदार विदया चव्हाण यांनी बालकांच्या हित रक्षणासाठी आपण अनेक कायदे केले आहेत. परंतु बालधोरण फक्त कागदावरच राहिले आहे असा आरोप सरकारवर केला. अंगणवाडी सेविका ग्रामीण भागात अनाथ,आदिवासी, ऊसतोड कामगारांची मुले,बांधकाम मजूर,आत्महत्याग्रस्त शेतकर्यांची मुले,अनुसूचित जातीतील मुलांसाठी एकात्मिक बालविकास कार्यक्रम राबवण्याचे काम अंगणवाडी सेविका करत असतात.त्यामुळे अंगणवाडया बंद न करता त्या वाढवल्या पाहीजेत.

शहरी भागातही कुपोषणाची समस्या गंभीर आहे. त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये अंगणवाडी उभ्या करणे गरजेचे आहे अशी मागणीही आमदार विदया चव्हाण यांनी केली

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...