जल्लोष करू पण नेमकं काय झालंय , कसं झालंय हे तर सांगा – अजित पवार

ajit pawar

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी सत्ताधारी भाजपाला सुनावले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारमधील मंत्र्यांकडून विविध मते मांडली जात आहे. यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री सांगत आहे की जल्लोष करा. पण जल्लोष करण्यापूर्वी नेमकं काय झालंय, कसं झालंय हे त्यांनी सांगावं, असे अजित पवारांनी म्हटले आहे.

दरम्यान, ओबीसी, एससी, एसटी अशा कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणारच अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मराठ्यांनो एक डिसेंम्बर ला जल्लोष करा असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचे शनी शिंगणापूर येथे झालेल्या शेतकरी-वारकरी महासंमेलन मेळाव्यात सांगितले होते. आता मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचा धागा पकडून अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं आहे.