राष्ट्रवादीच्या मंत्र्याच्या पुतणीचा काँग्रेस आमदार असलेल्या सासऱ्यांवर गंभीर आरोप; गुन्हा दाखल

ncp vs congress

कोल्हापूर : सध्या महिला अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्र हादरला आहे. अशातच काँग्रेस आमदाराच्या सुनेने सासऱ्यांसह, पती व नणंद यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. अदिती राजेश पाटील यांनी कराड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

त्यानुसार पांडुरंग निवृत्ती उर्फ पी एन पाटील, त्यांचे पुत्र राजेश पाटील आणि कन्या टीना महेश पाटील यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तक्रारदार आदिती पाटील या राष्ट्रवादीचे नेते आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी आहे. त्यांच्या या आरोपांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, दोन वर्षापूर्वी पी.एन. पाटील यांचा मुलगा राजेश व अदिती यांचा मोठ्या थाटामाटात कोल्हापुरात विवाह संपन्न झाला. लग्नानंतर आपला सासरी छळ करतानाच एक कोटीची मागणी केल्याचे अदिती यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन. पाटील, पती राजेश पांडुरंग पाटील व नणंद सौ. टीना महेश पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पी. एन. पाटील हे काँग्रेसचे बडे नेते असून करवीर मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. तर त्यांच्या सूनबाई आदिती यांचे काका बाळासाहेब पाटील हे ठाकरे सरकारमध्ये सहकार मंत्री आहेत. आदिती यांचे वडील सुभाष पाटील हेसुद्धा जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे नेते आहेत. गेले दोन-तीन महिने या कुटुंबात वाद सुरु असल्याचा दावा केला जातो. हा वाद मिटवण्यासाठी राजकीय स्तरावरही समेट घडवण्याचे प्रयत्न झाले होते, पण त्याला यश आलं नाही.

महत्वाच्या बातम्या :