पक्षातील नेत्याच्या मुलीच्या विनयभंगा प्रकरणी राष्ट्रवादीचा ‘हा’ मंत्री अडचणीत

ncp

तिरूअनंतपुरम : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे केरळ सरकारमध्ये असणारे एकमेव मंत्री सध्या चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. केरळ सरकारमध्ये वनमंत्री असलेले ए. के. शशींद्रन यांच्यावर त्यांच्याच म्हणजेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील एका स्थानिक नेत्याच्या मुलीने पक्षाच्या राज्य कार्यकारिणीतील एका सदस्याविरूध्द विनयभंगाची तक्रार केली आहे.

या प्रकरणात शशींद्रन यांनी मुलीच्या वडिलांना फोन करून प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप पिडीत मुलीने केला आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला असून राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. ‘केरळचे वनमंत्री ए. के. सशिंद्रन यांनी कोणतेही अवैध कृत्य केले आहे.’ असे वरिष्ठ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बुधवारी म्हणाले.

केरळातील कोल्लम जिल्ह्यातील कुंदरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्याच्या मुलीने तक्रार दिली आहे. पक्षाचे राज्य कार्यकारिणीतील सदस्य जी. पद्माकरन यांच्याविरुध्द 28 जून रोजी तक्रार देण्यात आली आहे. वडील राष्ट्रवादीत असले तरी ही मुलगी भाजपची कार्यकर्ता आहे.

तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव टी पी पीथमबरन म्हणाले की, ‘कोल्लममध्ये केवळ काही पक्षाशी संबंधित प्रश्न सोडविण्याचा मंत्र्यांनी प्रयत्न केला असून त्याशिवाय कोणत्याही लैंगिक छळाच्या प्रकरणात त्यांनी हस्तक्षेप केला नाही.’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शशींद्रन व मुलीच्या वडिलांमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर राज्यात हे प्रकरण गाजू लागले आहे.

दरम्यान, शशींद्रन यांनी मुलीची तक्रार विनयभंगाची असल्याबाबत आपल्याला माहिती नव्हते. पक्षातील दोन कार्यकर्त्यांमधील हा वाद असल्याचे आपल्याला वाटले होते. विनयभंगाबाबत समजल्यानंतर पुन्हा फोन केला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस व भाजपने शशींद्रन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीच्या नेते त्यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. त्यांनी कुठलंही गैरकृत्य केलं नसल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे.

शशींद्रन यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पीडितेवर दबाव टाकण्याचा आरोप केल्याने त्यांना पदावर राहण्याचा अधिकारी नाही, असे विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतिशन म्हणाले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुदेंद्रन यांनीही शशींद्रन यांच्यावर करत राजीनाम्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP